विदर्भ

शेतकरी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपुर – जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथे कर्जापायी तरुण शेतकऱ्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. होमराज प्रेमदास किरमिरे वय 35 असे तरुण मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

आवळगाव येथील होमराज किरमिरे हा पत्नी, आई, मुलगा मुलगीसह कुटुंब चालवायचा . मिळेल ते काम करून व पाच एकर शेती मधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दोन वर्षांपूर्वी वडील हे कॅन्सरने मृत पावले होते. त्यांच्या उपचाराकरिता महिला बचत गट व बँकेकडून होमराज किरमिरे यांनी कर्ज उचलले होते. अशातच सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे किरमिरे हा आर्थिक विवंचनेत सापडला. शेतीमधून उत्पन्न न आल्याने होमराजची पत्नी ही घरखर्च व लोकांच्या कर्जाची परतफेड करण्याकरिता हातभार लागावा म्हणून कर्नाटक येथे धान रोवणीकरिता गेली होती. महिला बचत गटाचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडती झाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतक शेतकरी किरमिरे यांच्यावर सेवा सहकारी संस्था आवळगाव, महिला बचत गट व खाजगी लोकांचे कर्ज असल्याचे माहिती समोर येत आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment