विदर्भ

शेतकरी थेट वाघाशी भिडला

चंद्रपूर – वाघ म्हटलं की अनेकांची घाबरगुंडी उडते. नुसत्या नावाने अंग शाहारत. विचार करा, हा वाघ अचानक तुमच्या पुढे आला तर ? एका शेतकऱ्याच्या अगदी समोर येवून वाघ उभा राहिला. मृत्यू अटळ होता. अशा स्थितीत शेतकरी थेट वाघाशी भिडला. सोबतीला त्याची पत्नी धावून आली. या झटापटीत शेतकरी जखमी झाला. मनोज कुमरे असे शेतकऱ्याचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

धान कापणी, मळनीनंतर अनेक शेतकरी कापूस पिकांची काढणी करणे, वेचणे आणि गोळा करण्याच्या कामाला लागले आहेत. केरोडा येथील मनोज कुमरे याने स्वतःच्या मालकीच्या शेतात कापसाची लागवड केली होती. सध्या कापूस काढणे, वेचणे व गोळा करण्याच्या कामे सुरू आहे. मंगळवारी मनोज कुमरे हा पत्नी, बहीणीसोबत आपल्या शेतात कापूस काढणे, वेचण्याचे काम करीत होता. सायंकाळी चार वाजता मनोज शौचालयासाठी गेला. तेव्हा त्याची पत्नी आणि बहीण कापसू वेचत होत्या. त्याचवेळेस त्यांच्यासमोरून वाघ मनोज शौचास गेला तिकडे जात होता. त्यामुळे पत्नी, बहीणीने मनोज याला आवाज देणे सुरू केले. त्याच कालावधीत मनोज आणि वाघ समोरासमोर आले. समोर वाघ बघून मनोजची भंबेरी उडाली. मात्र, त्याने हिमंत सोडली नाही. वाघाने सावज पुढे बघून लगेच मनोजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोजने क्षणाचाही विलंब न करता हातामध्ये असलेल्या रिकामी बॉटलने थेट वाघाचा प्रतिकार केला. त्याला दोनदा बाजूला फेकले. यादरम्यान मनोजची पत्नी आणि बहिणीने आरडाओरड सुरू केली. मनोजला काठी दिली. त्यानंतर वाघाने पलायन केले . या घटनेत मनोज जखमी झाला. त्याला व्याहाड येथील प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment