विदर्भ

शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर बसून केले चक्काजाम आंदोलन

अडगाव – गेल्या चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकरी व नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. तर ५ जानेवारी ला अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला आणि शेतकऱ्यांनी अडगाव मुख्य रस्त्यावर बसून चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. घटनेची माहिती स्थानिक आमदार यशोमती ठाकूर यांना मिळताच चक्काजाम आंदोलनास सुरु असलेल्या घटनास्थळी त्या तात्काळ दाखल झाल्या आणि शेतकऱ्याची आणि नागरिकांची चर्चा करून सर्व माहिती जाणून घेतली. त्याच्या अडचणी बद्दल शहनिशा केली, व तात्काळ वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचरण करून अधिकाऱ्यांशी शेतकरी यांचा संवाद करून लवकरच तोडगा काढण्यात येईल असेही अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले, याप्रसंगी अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करू अशी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आमदार यशोमती ठाकूरसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment