अमरावती – कडाक्याच्याथंडीने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढविली असून थंडीमुळे रब्बी शेतीपिकाला फटका बसत असून गहू , हरभरा ,पिकावर बुरशीजन्य आणि किडीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. आता हरभरा पीक ऐन फुलावर असताना अचानक बदल घडून आला. फुल अवस्थे मधील फुलोरा जळण्याच्या अवस्थेत असून याचा मोठा फटका पिकाला बसत आहे. खरीप हंगामात पिकांचे अधिक नुकसान होऊन शेतकरी हतबल झाला आहे. त्यातून तो कसाबसा सावरला तेच रब्बी हंगामातील पिकामध्ये सुद्धा तिच परिस्थिती शेतकऱ्याच्या पदरी पडतांना दिसून येते. पिकाला पिकवणे करीत त्याची निगा राखणे करीत आणि वन्यजीवांकडून सुरक्षित ठेवणे करिता शेतात जागरणाला जावे लागते. त्यात कडाक्याची थंडी यामुळे सुद्धा शेतकरी यांचे आरोग्यावर परिमाण होत आहे. आता तरी शासनाने शेतकरी यांची थट्टा करणे थांबवावे आणि शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव देऊन आणि आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्याला दुष्काळी चक्रातून बाहेर काढावे परिणामी शेतकरी अन्नदाता आहे हे मात्र विसरून चालणार नाही .