कोल्हापूर – शेतात सामाईक बांधाच्या कारणातून विळा, काठीने केलेल्या हल्ल्यात संदीप आनंदा पाटील (वय ३३, रा. कांचनवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. कांचनवाडी (ता. करवीर) येथे ही घटना घडली. याप्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू भाऊ पाटील, संभाजी मारुती पाटील, रूपाली संभाजी पाटील, अभिजित रामचंद्र जाधव (रा. कांचनवाडी, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फियादी संदीप व संशयित विष्णू पाटील यांची शेतजमीन शेजारी लागून आहे.
सामाईक बांधावरून त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू आहे. संदीप पोकलॅनच्या सहाय्याने शेतात बंडिंग करीत असताना वादाला सुरुवात झाली. त्यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यांनी विळा, दगड, काठीने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संदीप गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.