महाराष्ट्र

कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

शिंदखेड – शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकऱ्यांने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनात मोहनसिंग गिरासे रा.वाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावातील शेतकरी लोटनसिंग इंद्रसिंग गिरासे यांची वाडी शिवारात ३ एकर शेती आहे. शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मालपुर शाखेतून कृषी कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडण्याच्या विचाराने तणावात व विंवचनेत होते. काल सायंकाळच्या सुमारास शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी गावाबाहेरील दिवान गिरासे यांच्या शेतातील खोल विहीरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता लोटनसिंग गिरारे हे खोल विहीरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. लोटनसिंग गिरासे यांना विहीरी बाहेर काढून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ सुशांत गवांदे यांनी तपासून लोटनसिंग गिरासे यांना मृत घोषित केले. या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेननात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment