विदर्भ

मुलींच्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून धुळ्यात सुरुवात

धुळे – जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज मुलींसाठी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. ९०० हुन अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडत आहे. आज एक तृतीयपंथी उमेदवार देखील हजर झाला होता. त्यासोबत माजी सैनिक यांची देखील मैदानी चाचणी पार पडणार आहे.

संपूर्ण राज्यत पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे. मुलांची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर, आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज ७. ६ अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील मुलींची गर्दी ही लक्षणीय होती. ९०० हुन अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडत आहे.

राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तृतीय पंथीयांना स्थान दिल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये तृतीयपंथी उमेदवार पोलीस भरतीची मैदानी चाचणी देत आहेत, धुळे शहरातील देखील पोलीस मुख्यालयात आलेल्या तृतीयपंथी उमेदवाराने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य शासनाने अद्याप कोणतेही मैदानी चाचणी बाबत तृतीयपंथीयांचे निर्देश दिलेले नसल्याने कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून लवकरच शासनाने आमच्याही मैदानी चाचणीचे निर्देश द्यावे अशी विनंती तृतीयपंथी उमेदवार असलेल्या जोगी यांनी यावेळी केली.

धुळे शहरातील पोलीस मुख्यालय या सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे, आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली यावेळी जळगाव येथून आलेल्या एका तृतीयपंथी उमेदवाराची देखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच माजी सैनिक देखील आज मैदानी चाचणीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील महिला उमेदवार माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मैदानी चाचणीसाठी लावली होती.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment