विदर्भ

अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली

अमरावती – गेल्या चार दिवसापासून बंद असलेला अमरावतीकरांचा पाणीपुरवठा झाला आजपासून सुरु. दिनांक ३ डिसेंबर पासून संपूर्ण अमरावतीसह बडनेरा शहारला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लीक होऊन फुटल्याने अमरावतीकरांना तब्बल चार ते पाच दिवस पाण्याकरिता मोठी कसरत करावी लागली. मोर्शी तालुक्यातील नल दमयंती सरोवरातून संपूर्ण अमरावती सह बडनेरा शहारला पाणी पुरवठा केला जातो. बोरगाव धर्माळे नजीक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लीक होऊन फुटल्याने कालपर्यंत बंद होती अखेर एकूण चार दिवसाच्या कसरतीनंतर पाणीपुरवठा विभागाला पाईपलाईन दुरुस्त करण्यात यश आले असून संपूर्ण अमरावती सह बडनेरा शहारला पाणी पुरवठा अजपासूज टप्या टप्या ने केला जाईल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment