विदर्भ समाजकारण

नागपुरातील दोन उच्चशिक्षित मैत्रिणी अडकणार विवाहबंधनात

नागपूर शहरातील पहिला ‘लेस्बियन’ विवाह येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. शहरातील दोन उच्चशिक्षित मैत्रिणींनी एकमेकींशी साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या लग्नसोहळ्याला दोघींच्या घरच्यांनी आनंदाने संमती दिली आहे… या दोघींच्या लग्नामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यतेबरोबरच समाजमान्यता ही मिळाली आहे, ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.

By सुनीता झाडे

नागपूरः प्रेम, संरक्षण, काळजी, जपणूक आणि स्वीकार केला की कोणतीही व्यक्ती आपलीशी होऊन जाते. अगदी त्यासाठी आपसातील लिंगभेदही विसरला जातो. अशा घट्ट मैत्रीचे कितीतरी दाखले आपल्या अवतीभवती बघायला मिळतात. त्यात मग लैंगिक संबधही असतील तर एकमेकांसोबत कुटुंबाचा विरोध पत्करून सुखाने नांदतात. भिन्नलिंगी असतील तर समाजाचा विरोध पत्करून सोबत राहतात. एकमेकांसाठी काहीही सहन करायची त्यांची तयारी असते. परंतु आता कायद्याने समलैंगिक असणे गुन्हा नसल्याने ते आपसा विवाह करू लागले आहेत. अर्थात अजूनही या गोष्टीचा हवा तसा स्वीकार अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत खुल्याने अशा संबधांचा कुटुंबियांकडून, समाजाकडून स्वीकार झाला तर तो नक्कीच चर्चेचा आणि त्यातही सर्वात जास्त कुतुहलाचा विषय ठरतो.

डॉ.कविता आणि कल्पना विवाहबंधनात

नागपूरमध्ये  होमो सेक्शुअल मैत्रिणींनी साखरपुडा केला आणि त्या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली. एका वैद्यकीय परिषदेमध्ये नागपूरची डॉ. कल्पना (नाव बदललेले आहे.) आणि कलकत्त्याहून आलेली कविता (नाव बदललेले आहे) यांची भेट झाली. दोघींच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीमध्ये त्यांची एकमेकींशी जवळीक वाढली आणि त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले.  एकमेकांबाबत प्रेम, संरक्षण, काळजी वाटू लागली. पुढे त्यांच्यात प्रेमभावना निर्माण झाली आणि त्यातूनच एकमेकींचा पूर्ण स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेब्रुवारीत होणार विवाह

सहसा प्रेमविवाहास विरोध करणार्‍या समाजात दोन मुलींचा विवाह ही अजूनच अडचणीची बाब ठरते आहे. परंतु दोघींच्या कुटुंबियांनी त्याला सहमती दिली. नुकतास शहरातील एका रिसोर्टमध्ये त्यांचा साखरपुडा पार झाला असून येत्या फेब्रुवारीत या दोघीजणी लग्नबंधनात अडकणार आहेत.

कुटुंबियांचा स्वीकार आणि समाजाची मान्यता

डॉ. कल्पना १९ वर्षाची असतांना सर्वप्रथम तिने वडिलांना ती होमोसेक्शुअल असल्याचे सांगितले. आता ती ३० वर्षांची आहे.  तिचे आणि घरच्यांशी संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आणि सर्वसामान्यांसारखेच आहेत. रूपाच्याही वडिलांना आणि मोठ्या बहिणीला ती होमो सेक्शुअल असल्याची माहित होती. रूपा आता २८ वर्षांची आहे. रुपाच्या आईला मात्र हे आता कळल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. या दोघींच्या विवाहाला कुटुंबियांनी स्वीकारल्याने आणि  समाजाचीही मान्यता मिळाल्याने एलजीबीटी समूहात आनंदाचे वातावरण आहे.  

होमो सेक्शुआलिटीबाबत
समलैंगिक असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलैंगिक संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.
समलैंगिक असणे ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतीत करावेसे वाटते याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment