रत्नागिरी – खेड तालुक्यात डोंगरात लागलेला वणवा विझवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावातील ग्रामस्थांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याला मारून बघणे जवळपास वीस संशयित रावसाहेब वरती खेळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये वन विभागातील एक वनरक्षक डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाला आहे.
खेड तालुक्यातील सातवीणगाव वनभूखंड क्रमांक २७ ड चे वनक्षेत्राच्या उत्तर दिशेच्या खाजगी मालकी क्षेत्रात वणवा लागल्याची माहिती शनिवारी सकाळी ११ ४५ च्या सुमारास वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर, वनपाल खेड, वनरक्षक काडवली, वनरक्षक तळे, वनरक्षक खवटी व मौजे मोरवंडे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी येथील ग्रामस्थ यांचेसमवेत सातवीणगांव वनभूखंड २७ ड चे वनक्षेत्राच्या उत्तरेकडील हद्दीतून वणवा वनक्षेत्रामध्ये जावू नये, वनांचे अगीपासून संरक्षण करणेकामी याकरीता वणवा वनक्षेत्राजवळ येताच, तो विझवण्यांचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी सायंकाळी ४.४५ वाजता दाभिळ, बैकरवाडी येथील २० ते २५ इसम यांनी शासकीय वनांमध्ये प्रवेश करून, वणवा हा वनकर्मचारी यांनीच लावला आहे अशी समज करून घेत जमाव आक्रमक झाला. वनकर्मचारी यांचेशी वादविवाद करू लागले. त्यावेळी वनकर्मचारी यांनी उपस्थित जमावास ‘आम्ही वनकर्मचारी आहे, सदरचा वणवा हा बोरज या गांवाच्या दिशेने आला आहे. व तो आम्ही वनक्षेत्रमध्ये जावू नये, तसेच वनांचे आगीपासून संरक्षण करणेचे कर्तव्य करत आहे. तरी आपणही सदरचा वणवा विझवणेसाठी मदत करावी’, असे आव्हान करत होते.
मात्र तरीही या जमावामधील निलेश फावरे रा. दाभिळ, बैकरवाडी व त्यांचे सोबत असलेले इतर २० लोकांनी परमेश्वर नवनाथ डोईफोडे, वनरक्षक तळे यांचे डोक्यात लाकडीकाठीने मारून त्यांना जखमी केले. तसेच वनरक्षक काडवली अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वनक्षेत्राच्या हद्दीखुणामध्ये बदल केलेला आहे. सदर हल्ल्यामध्ये परमेश्वर नवनाथ डोईफोडे, वनरक्षक तळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने, त्यांना औषधोउपचाराकरीता कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये तात्काळ दाखल करणेत आले.
याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६, ६३ चा भंग झाल्याने, संशयित आरोपी १. श्री. निलेश फावरे रा. दाभिळ, बैकरवाडी २. श्री. अरविंद फावरे रा. दाभिळ, बैकरवाडी ३. श्री. धोंडु बैकर रा. दाभिळ, बैकरवाडी व इतर -२० यांचेविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. तसेच सदर प्रकरणी वरील संशयित आरोपी यांचे विरूध्द पोलीस ठाणे खेड येथे दिनांक २९.०१.२०२३ अन्वये भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. या प्रकरणी निलेश फावरे , अरविंद फावरे , धोंडु बैकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.