देश-विदेश

राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी राज्याला चार पुरस्कार

नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या शासकीय तसेच खाजगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार पुरस्कार राज्याला राष्ट्रपती यांनी प्रदान केले.

येथील विज्ञान भवनात आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री क्रीष्ण पाल, सचिव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूरच्या श्रीराम गर्ल्स हायस्कुलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला असून आज राष्ट्रपती यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने २००५ पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment