पश्चिम महाराष्ट्र

मित्राच्या सरपंचपदासाठी मित्राचा आगळा वेगळा नवस…

पुणे – ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या करताना आपल्याला पहायला मिळतात. मात्र पुण्यातील एका अवलीयाने चक्क मित्र निवडून यावा यासाठी देवाला नवस बोलला आणि निवडणुकीत निवडून आल्यानंतर तो नवस फेडला देखील. विकास अशोक कदम आणि योगेश विकास काळे अशी दोघांची नावे आहेत. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत तंटामुक्ती अध्यक्ष असलेले विकास कदम यांनी सरपंचपदासाठी उभा असलेला आपला मित्र चित्तरंजन गायकवाड यांची सरपंच पदी निवड व्हावी या मागणीसाठी तसेच त्यांच्या प्रभागात उभे असलेले अन्य उमेदवार देखील निवडून यावे साठी कदम वावाकवस्ती येथील गणेश मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा नवस त्यांनी बोलला होता. त्यानुसार निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड आणि त्यांचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे विकास कदम आणि त्यांचे दुसरे मित्र योगेश काळभोर यांनी पुणे – सोलापूर महामार्ग ते कदम वाक वस्ती येथील गणेश मंदिरापर्यंत असणारे ५०० मीटर अंतर दंडवत घालून पूर्ण केले. या दंडवत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सद्या या आगळ्या वेगळ्या नवसाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून एका मित्रासाठी दुसरा मित्र काय करू शकतो याचे हे उदाहरण म्हटले तरी वेगळे ठरणार नाही. दंडवत घालत असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन देत विजयी घोषणा दिल्या. कदमवाकवस्ती ही हवेली तालुक्यातील तशी मोठी ग्रामपंचायत. हवेली तालुका हा निवडणुकीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदाची ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची झालेली पहायला मिळाली. मात्र संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चा फक्त या आगळ्या वेगळ्या नवसाचीच एकायाला मिळत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment