पश्चिम महाराष्ट्र

टेलरच्या चिट्टीवरून मयताची ओळख पटली; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर- सोलापूर शहरातील चिप्पा मार्केट येथे रविवारी सकाळी १५ जानेवारी रोजी एका ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला होता. डोक्यात फरशी घालून चेहरा विद्रुप करून त्याचा खून करण्यात आला होता. पण हा मृतदेह कोणाचा, त्याचे नातेवाईक कोण याबाबतचा शोध सोमवार पर्यंत लागला नव्हता. पोलीस तपास करत असताना, चिप्पा मार्केट, अशोक चौक असे जवळपास तीनकिलोमीटरवर अंतरावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. सोलापूर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सर्व सूत्रे फिरवून वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. एक संशयीत इसम हा,चिप्पा मार्केटजवळ कागद फेकतानाच चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले, यावरून पोलिसांनी ताबडतोब ती चिट्टी त्या जागेवरून ताब्यात घेतली. क्राईम ब्रँचचे अधिकारी एपीआय क्षीरसागर यांनी ती चिट्टी घेतली असता, एका टेलरची चिट्टी होती, त्या टेलरकडे विचारपूस करून मयताची ओळख पटली. बबलू हुंडेकरी(रा,पद्मा नगर,अक्कलकोट रोड सोलापूर)असे मयताचे नाव होते. त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देऊन सविस्तर माहिती घेतली व खून करणाऱ्या बबलू हुंडेकरीच्या मारेकऱ्यास २४ तासांच्या आत जेरबंद केले.

सीसीटीव्ही बारकाईने तपासून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी चिप्पा मार्केट जवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये मयत बबलू हुंडेकरी सोबत एका संशयी इसम चिप्पा मार्केट कडे येताना दिसत आहे. जाताना मात्र एकच व्यक्ती दिसत होता. सदर संशयीत इसम हा खून करुन तीन वेळा घटनास्थळवर येऊन पाहणी करत होता. शेवटच्या फेरीत जाताना त्याने, एक चिट्टी फेकली होती. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. पोलिसांनी हाच धागा धरत मृताची ओळख समोर आणली आणि त्याच्या नातेवाईकांना खबर दिली व संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मृत बबलूने टेलरकडे कपडे शिवायला टाकले होते
ट्रक ड्रायव्हर बबलू हुंडेकरी याने १४ जानेवारी २०२३ रोजी सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील एका टेलरकडे कपडे शिवायला टाकले होते. टेलरने त्याची पोच पावती बबलूला दिली होती. एक संशयीत इसम चिप्पा मार्केट येथे खून झाल्या ठिकाणी तीन वेळा घुटमळत आहे, व जाताना एक कागद फेकत आहे, हे दृश्य पाहून पोलिसांन संशय आला, व सदर ठिकाणी जाऊन चिट्टी उचलली, ते कागद म्हणजे टेलरची पोचपावती, त्यावर नाव होते बबलू हुंडेकरी. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी टेलरकडे जाऊन सविस्तर माहिती घेतली, बबलूचा पत्ता काढत चौकशी केली. सीसीटीव्ही मधील सदर संशयीत इसमाची चौकशी केली असता, बबलू व त्याच्या मित्राचा शोध लागला.

मित्राने फुल्ल दारू पाजून केला बबलूचा घात
क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सीसीटीव्ही मधील संशयीत इसमाचे चित्रीकरण दाखवले. नागरिकांनी माहिती दिली की हा तर बसवराज आहे, बबलूचा मित्र आहे. बसवराज रवींद्र अतनुरे(वय २५ वर्ष,रा,पद्मा नगर,अक्कलकोट रोड ,सोलापूर) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली आहे.१५ जानेवारीच्या मध्यरात्री बबलू व बसवराज हे दोघे सोबत होते, त्यांनी इंपिरियल ब्लु व्हिस्की लावली. स्मशान शांतता असलेल्या चिप्पा मार्केट येथील कट्ट्यावर बबलूचा डोक्यात फरशी घालून खून केल्याची माहिती दिली. याबाबत रविवारीच जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. क्राईम ब्रँचने खून करणाऱ्या संशयीत आरोपी बसवराज अतनुरे यास जेलरोड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.या खुनाचा तपास लावण्यात एपीआय संजय क्षीरसागर, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, कृष्णात कोळी, निळोफर तांबोळी, सतीश काटे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी सुनील दोरगे यांनी माहिती देताना सांगितले की, बसवराजने बबलूचा खून का केला,यामागे काय कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment