देश-विदेश राजकारण

रजनी पाटील यांना कांग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

विलासराव देशमुख ,राजीव सातव यांच्या रिक्त जागी रजनी पाटील 

नवी दिल्ली ता २० — कांग्रेस पक्षाने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून बीडच्या  रजनी पाटील यांच्या नावाची आज घोषणा केली . मुकुल वासनिक आणि रजनी पाटील अशी चुरस चालू होती . त्यात पाटील यांनी बाजी मारली असे कांग्रेसकडून समजले . मुकुल वासनिक हे कांग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत . त्यांच्या स्वाक्षरीने कांग्रेसने पाटील यांची उमेदवारी जाहीर केली . पाटील या सध्या कांग्रेसच्या सरचिटणीस असून त्या जम्मू आणि काश्मीरच्या पक्ष प्रभारी आहेत .    

माजी दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोली जिल्ह्यातील होते . त्यांच्या जागी मराठवाड्यातील कोणालातरी उमेदवारी दिली जावी असा विचार पक्षात करण्यात आला आणि त्यावर मोहर उमटवण्यात आली .

बीडचे अनुसूचित जातीचे (एस सी ) कांग्रेस नेते रवींद्र दळवी हे देखील उमेदवारी मागत होते . राज्य आणि राज्याबाहेरील नेते उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते . यात गुलाम नबी आझाद (जम्मू आणि काश्मीर ) , रणदीपसिंग सुरजेवाला (हरियाणा ) आणि राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश ) यांचा समावेश होता .

महाराष्ट्रातून उमेदवारी मागणाऱ्याची यादी मोठी होती .    रजनी पाटील या दोन वेळा भाजपकडून लोकसभेच्या खासदार होत्या .  त्या या आधी कांग्रेसकडून राज्यसभेच्या खासदार ही होत्या . माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख राज्यसभेवर खासदार होते . ते केंद्रात अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री होते . त्यांचे अकाली निधन झाले . त्यावेळी रिक्त झालेल्या जागेवर कांग्रेसने विलासराव देशमुख यांच्या पत्नीला उमेदवारी न देता रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती .

त्यांना त्या वेळी सुमारे साडेचार वर्षाचा कालावधी मिळाला होता . राज्यसभेचा सदस्य हा ६ वर्षांसाठी असतो . पोटनिवडणुकीत उर्वरित कालावधीसाठी खासदार राहता येते . आता राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली .    

रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती . पण तमिळनाडूचे पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली . त्या वेळी रजनी पाटील रडल्या होत्या . कांग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामागे यंग इंडिया वृत्तपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात  चौकशी चालू आहे . हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे .

या आर्थिक गैरव्हवहार प्रकरणाशी संबधीत अहमद पटेल , मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस आज हयात नाहीत . पी चिदंबरम हे वकील आहेत . ते भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या जवळचे होते . न्यायलयीन खटला लढणे सोपे जावे यामुळे पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली होती . खासदार झाल्यावर दिल्लीत राहता येते आणि अरुण जेटली यांच्या बरोबरीच्या मैत्रीचा फायदा होईल हा हेतू त्यावेळी ठेवण्यात आला होता .  

 महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे शिवराज पाटील यांना उमेदवारी देण्याच्या बाजूने होते . शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर ,मराठवाडा महाराष्ट्रातील आहेत . महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली . मात्र ते सोनिया गांधी यांना भेटले नाहीत . नाना पटोले १० जनपथ या सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन परत आले .

पंजाब राज्यातील राजकारण वेगाने घडत होते . सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या निवासस्थानी पंजाबचे राजकारण गतीने बदलत होते . त्यामुळे नाना पटोले यांना सोनिया गांधी यांना भेटण्याची  वेळ मिळाली नाही असे समजले . मात्र आज रजनी पाटील यांचे नाव पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment