महाराष्ट्र मुंबई

मुंबईत भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी गजाआड

मुंबई – उपनगरातील कांजूरमार्ग पोलिसांनी भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. वर्षा कांबळे ह्यांचा दोन लहान मुलांचे कांजुर मार्ग येथील फुटपाथ वरून अपहरण करण्यात आलं होतं. वर्षा कांबळे यांनी कांजूरमार्ग पोलीस पोलीस ठाण्यात आपल्या मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार करत गुन्हा दाखल केला. पुण्याहून मुंबईकडे येताना रेल्वे प्रवासात वर्षाची आरोपीचा कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याच माहिती तिनी पोलिसांना दिली.

गुन्हा दाखल होताच गुन्हातील गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड ( परिमंडळ ७) याने परिमंडळ सात मधील घाटकोपर कांजूरमार्ग विक्रोळी पार्क साईट नवघर मुलुंड या पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक बनवले. मात्र पोलिसांकडे आरोपी बाबत कोणतेही ठोस पुरावे फोटो किंवा मोबाईल नंबर असे काही नव्हते तरीदेखील तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली. कांजूरमार् रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर आरोपीचीं ओळख काढण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यात सर्व आरोपी हे काळे कुटुंबीय होते. काळे कुटुंबाने मुलांचे अपहरण करत ठाणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद या शहरात फिरत होते. या मुलांचे अपहरण करून उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागायला लावणार होते. तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिसांनी काळे कुटुंबीयांना अकरा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जळगाव या ठिकाणी छापा टाकत आरोपींना अटक केली. ज्या दोन मुलांचे अपहरण केले होते त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मुख्य सूत्रधार हा हर्षद काळे होता. हर्षद काळे सोबत चंदू काळे आणि ताराबाई काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे हर्षद काळे याची पत्नी पोर्णिमा काळे हे अद्याप फरार आहे. पोलिसांनी आपल्या ११ दिवसाच्या अथक प्रयत्नाने मुलांना सुखरूप सोडवले जरी असले तरी पुढे या मुलांचं हे लोक काय करायचे आणि आतापर्यंत अशी किती मुले त्यांनी अपहरण केली आहेत याचा तपास सध्या कांजूर मार्ग पोलीस करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment