कोंकण

धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वाशी येथील घटना

,
सात आरोपी अटकेत, तीन आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

रायगड, ब्युरो

रायगड जिल्ह्यातील पेण वाशी परिसरात 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात पोलिसांकडून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे

रायगड जिल्ह्यातील पेण वाशी भागात धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची अमानुष घटना घडली आहे. तर या प्रकरणातील आरोपी दररोज आळीपाळीने युवतीवर बलात्कार करत असल्याची घटना उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त

र सामुहिक बलात्कार प्रकरणात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार घडल्याच्या घटना समोर आल्या. या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा कालवंडलेली पाहायला मिळाली.

या घटना ताज्या असतानाच आता रायगड जिल्ह्यातील पेण मधील वाशी गावातील बलात्काराची घटना समोर आली. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. सदर घटनेची सखोल चौकशी पेण पोलीस करीत आहेत.

नेमकं काय घडलं ?
वडखळ पोलिसांच्या माहितीनुसार एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसोबत राहत होते. मात्र या मुलीला या भागातील तरुण अनेक दिवसांपासून या ना त्या कारणावरून सतत धमकावत होते. मागील अनेक दिवसांपासून हे तरुण मुलीवर आळीपाळीने बलात्कार करत होते.

बलात्काराची घटना माहीत होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. या घटनेतील पोलिसांनी सात आरोपी ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. वडखळ पोलीसांनी या घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास वडखळ पोलिस करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment