जयसिंगपूर – इंजीनियरिंग विद्यार्थ्यांना क्लाऊड कॉम्प्युटिंग चे प्रत्यक्ष ज्ञान, प्रशिक्षण मिळावे व संशोधन वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग तर्फे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २८ आणि २९ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. राजकुमार बुय्या सहभागीतांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, की संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये सुरू आहे. इंटरनेटच्या युगामध्ये संगणक विविध कारणांसाठी उपयोगात आणला जातोय. माहिती तंत्रज्ञान संबंधी काम करणाऱ्या विविध कंपन्या आता नवीन ॲप्लिकेशन्स व क्लाऊड सिस्टीम साठी काम करत आहेत. याची जगामध्ये कोट्यावधी लोक सेवा घेत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणाची गरज असल्या कारणाने या कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम लॅबोरेटरी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न ऑस्ट्रेलियाचे संचालक डॉ. राजकुमार बुय्या यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याबरोबरच हैदराबाद विद्यापीठाचे प्रो. सतीश शर्मा, व्हीएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रियाचे डॉ. शशिकांत लॅगर, एन.आय.टी.के सुरतकल मेंगलोरचे प्रो. चंद्रशेखरन के. आणि युनिव्हर्सिटी ऑफ टाटू इस्टोनिया चे संशोधक शिवानंद पुजार आणि स्वतः डॉ. बुय्या हे सर्व क्लाऊड कॉम्प्युटिंग विषयातले तज्ञ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख बी.सुरेश, यांनी कार्यशाळा समन्वयक दीपिका पाटील, सुरभी गायकवाड याच्याशी संपर्क साधून मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. तर संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.