विदर्भ

घोरपड पकडली, भाजली अन् खाणार तोच वन विभागाने पकडले

अमरावती – शहरातील कठोरा भागात राहणाऱ्या एका मजुराला खोदकामादरम्यान घोरपड नावाचा प्राणी सापडला त्यांनी आज ताव मारायचा ठरवून घोरपडला भाजून रोस्ट केले तेवढ्यातच असे काही घडले की त्याला घोरपडचा आस्वाद घेण्यापूर्वी सलमान खान आठवला आणि तो वनविभागासमोर ढसाढसा रडू लागला.

शहरातून कठोरा गावाकडे जाणाऱ्या मार्गालगत काही मजूर झोपड्या बांधून राहत आहेत. त्याच परिसरात त्यांचे काम सुरू आहे. एक व्यक्ती घोरपड भाजत असल्याची माहीती वन विभागाला मिळाली. या माहीतीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने भाजलेली घोरपड व घोरपड भाजणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याने ही घोरपड खाण्यासाठी भाजली होती मात्र खाण्यापुर्वीच तो वन विभागाच्या जाळ्यात आला आहे.

राजू श्याम रावजी शिंदे (४७, रा. वाठोडा शुक्लेश्वर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कठोरा मार्गावर रस्त्याच्या कडेला काही मजुरांच्या झोपड्या आहे. हे मजूर याच भागात कामासाठी आले असून त्यामध्ये राजू शिंदे आहे. मंगळवारी दुपारी जेसीबी मशीनद्वारे खोदकाम सुरू असताना शिंदेला एक घोरपड दिसली. ती दिसताच शिंदेची पकडली आणि तीला खाण्यासाठी आणली. झोपडीजवळ आणून घोरपड भाजली. घोरपड भाजत असतानाच ही माहीती वन विभागाच्या पथकाला मिळाली.

त्या माहीतीच्या आधारे डाळीच्या आरएफओ वर्षा हरणे, वनपाल श्याम देशमुख व अन्य कर्मचारी त्या परिसरात पोहोचले. वन विभागाच्या पथकाने पाहीले असता शिंदे घोरपड भाजत होता. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने ही भाजलेल्या स्थितीतील घोरपड व शिंदेला ताब्यात घेतले. शिंदेविरुद्ध वन गुन्ह्याप्रमाणे कारवाई करुन सखोल चौकशी सुरू केली आहे. जप्त केलेली घोरपड जवळपास एक फूट लांबीची असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment