देश-विदेश

अनिल देशमुख सारखाच न्याय नवाब मलिक यांना द्या- किरीट सोमैया

किरीट सोमैया आज पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर 

  • कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २५ —
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आथिर्क गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपावरून  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला अथवा त्यांचा राजीनामा घेतला गेला .
  • मग आता नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला जात नाही किंवा त्यांना राजीनामा देण्यास का सांगण्यात येत नाही . नवाब मलिक कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या जवळचे  असल्याने त्यांना  वेगळा न्याय का दिला जात  आहे असे प्रश्न भाजपचे  माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज दिल्लीत प्रसार माध्यमाशी बोलताना उपस्थित केले .    
  • किरीट सोमैया यांनी आर्थिक आणि गुन्हेगारी कृत्य प्रकरणाशी संबंधित विभागात जाऊन माहितीची देवाण -घेवाण केली . शिवाय त्यांनी अनेक वकिलाबरोबर सल्लामसलत केली . किरीट सोमय्या यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील २४ क्रमांकाच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .
  • गोपाळ शेट्टी यांच्या शेजारी शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पाबारणे यांचे निवासस्थान आहे . सोमैया आज सकाळीच दिल्लीत  आले आणि संबधितांना भेटून लवकर पुण्याला जाणार आहे असे त्यांनी म्हटले .  
  • ते  पुण्यात शिवाजीनगर पोलीस स्थानकात सकाळी ११ वाजता पोचणार आहेत . भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कांही गडबड होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे . आपण दिल्लीत कोणाकोणाची भेट घेणार आहात असा प्रश्न विचारल्यावर किरीट सोमैया यांनी या विषयी माहिती देण्याचे टाळले . मी ही माहिती देऊ शकत नाही असे हसत विधान त्यांनी केले . यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत  प्रसार माध्यमाला त्यांनी माहिती दिली .    
  • अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला . त्यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार मध्ये सहभागी असणाऱ्या राजकीय पक्षांनी आंदोलन का केले नाही असा सोमैया यांनी प्रश्न उपस्थित केला .
  • अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला तसा  नवाब मालिकांचा राजीनामा घेतला जावा . ते कारागृहात असताना मंत्रिमंडळ बैठकीत भाग कसे घेतील . मंत्रिमंडळाची बैठक आता ऑन – लाईन होईल का .
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेची पायमल्ली होणार नाही . यासाठी मलिक यांचा राजीनामा घेतला जावा असे सोमैया म्हणाले .  
  • शिवसेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध असल्याचे अनेक सभांमधून सांगितले होते . आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे जवळ आले आहेत  असे विधान देखील सोमैया यांनी केले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment