कोंकण महाराष्ट्र

गोवा दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात

सिंधुदुर्ग – गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ओव्हरलोड कंटेनर तोरसे येथे अवघड वळणावर पलटी झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघातानंतर आतील दारू रस्त्यावर विखुरली होती. सुदैवाने चालक व क्लीनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून गोवा दारूची अवैध वाहतूक होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता टीआर दारूणे खच्चा खच्च भरलेला कंटेनर पलटी झाल्यानंतर एका व्हानातून किती दारू वाहतूक केली जाते हे समोर आले आहे. दरम्यान दारू वाहतूक करणार्‍या या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ही दारू वाहतूक गाडीच्या पासिंग वरून हरियाणा येथे होत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनर मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत होती. तो ओव्हरलोड झाल्यामुळे तोरसे येथे अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर पलटी झाला. अपघातानंतर आतील दारूच्या काही बॉटल्स रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. अपघाताची तीव्रता लक्षात घेता आतील चालक व क्लिनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर गाडीच्या पासिंग वरून ही दारू हरियाणा येथे नेली जात असल्याचेसमोर आले आहे.

मुंबई गोवा महामार्ग हा अवैध वाहतुकीचा राजमार्ग बनला आहे. सातत्याने होणार्‍या या वाहतुकीकडे संबधित यंत्रणांचा दुर्लक्ष होत आहे. आता तर मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने एकावेळी किती दारू भरून नेली जाते ते समोर आले आहे. गोव्यातून महाराष्ट्र मार्गे थेट हरियाणापर्यंत दारूची रोजरोज वाहतूक होत असल्याचे समोर आले असून सर्वांचेच यामुळे धाबे दणाणले आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment