पश्चिम महाराष्ट्र

दोन तरुणांकडून एक कोटी रुपयांचे सोनं जप्त

सांगली – जिल्ह्यातील कवलापूर ग्रामपंचायतीजवळ दोन तरुणांकडून एक कोटी पाच लाखाचे सुमारे दोन किलो संशयास्पद सोने पोलीसांनी हस्तगत करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही माहिती दिली. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी (Gram Panchayat Election) संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गस्त घालत होते. कवलापूर पंचायतजवळ दोन तरुघेण्याणांना संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ १ किलो ९९४ ग्रॅम सोने बार स्वरुपात मिळाले. याचे मूल्य १ कोटी ५ लाख ६८ हजार २०० रुपये आहे. या प्रकरणी रोहित चव्हाण (२७) आणि संतोष नाईक (२६) या दोघांना ताब्यात आले आहे. सोन्याबाबत विचारले असता त्यांनी हे सोने विक्रम मंडले ज्वेलर (रा.बांबवडे सध्या जालना) यांचे असल्याचे सांगितले. मात्र मालकी सिध्द करणारी कागदपत्रे नसल्याने संशयास्पद सोने व तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गस्त घालून संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात होते. एक पथक सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस नाईक इम्रान मुल्ला, सचिन धोत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कवलापूर ग्रामपंचायतीसमोर गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोन तरुण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तातडीने कवलापूर ग्रामपंचायत परिसरात छापा टाकून रोहित चव्हाण व संतोष नाईक या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेण्यात आली. रोहित याच्या पँटच्या खिशात १०० तोळे (एक किलो), तर संतोषकडे ९९. ४ तोळे अशा दोन किलोच्या सोन्याच्या विटा सापडल्या. त्यांची किंमत एक कोटी ५ लाख ६८ हजार रुपये आहे.

या सोन्याबाबत पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली. हे सोने बांबवडे येथील सराफी मित्र विक्रम लक्ष्मण मंडले (सध्या रा. जालना) यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मंडले यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांच्याकडे मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने सोने जप्त केले आहे. संशयित दोन्ही तरुणांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment