पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात टायर गोदामाला भीषण आग, चार तासानंतर आग विझवण्यात यश

पुणे – पिंपरी चिंचवड परिसरातील कासारवाडी येथे असणाऱ्या मॅक्स नीरो हॉस्पिटलजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मध्यात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली होती.या ठिकाणी असणाऱ्या जुन्या टायर्सच्या मेसर्स जय गणेश टायर्स या स्क्रॅप यार्डला ही आग लागली होती. या घटनेत आगीची तीव्रता बघता हॉस्पिटल प्रशासनाने रुगांना वेगवेगळया रुग्णालयात हलविण्यात आले. पहाटेच्या पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील कासारवाडी परिसरात असणाऱ्या मॅक्स नीरो हॉस्पिटलजवळ असणाऱ्या एका जुन्या टायरच्या स्क्रॅप सेंटरला अचानक आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी एक जेसीबी आणि १४ अग्निशामक बंब घेऊन घटनास्थळी दखल झाले. पाण्याचा मारा करत रात्रीच्या दोन च्या सुमारास.लागल्या आगीवर पहाटे पाचच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

जय गणेश टायर्स हे कल्पना जैन आणि त्यांचा मुलगा महावीर जैन यांच्या मालकीचे आहे. आग लागल्याची माहिती समजताच जवळच असलेल्या मैत्री अपार्टमेंट्स या रहिवासी सोसायटीने मोठी मदत केली. स्वतःच्या फायर पंप आणि इक्विप्ट्सच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत नव्हते. मात्र त्यानंतर पीएमआरडीए, पुणे महानगर पालिका, खडकी कॅन्टोन्मेंट, पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीची तीव्रता लक्षात घेता शेजारी असलेल्या मॅक्स नीरो हॉस्पिटलने रुग्णालयातील १२ रुग्णांना वायसीएम, ३ बिर्ला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तर, ४ रुग्णांना घरी पोचवण्यात आले. आगीचे प्राथमिक कारण इ शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात आहे. मात्र वेळीच माहिती समजल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment