विदर्भ

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

अमरावती – तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानाची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे शेकडो शेतकरी संतप्त झाले होते. तर या शेतकऱ्यांनी तिवसा येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केल्या होत्या. मात्र तहसीलदार यांनी याबाबत योग्य समाधानकारक उत्तरे न दिल्याने अखेर ३ डिसेंबर ला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे धडक दिली. मात्र येथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन सादर केले, यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने पुढील आंदोलनात्मक भूमिका ही तीव्र घेतली जाईल असे सांगण्यात आले.

तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर दिलेल्या निवेदनानंतर अधिकाऱ्यांनी व राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे आता आम्ही थेट मुंबईत आंदोलन करू आणि या सर्वस्वी जबाबदार सरकार असेल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी प्रामुख्याने उपस्थित शेतकरी नेते दिनेश वानखडे,मेजर नरेश वानखडे , राजेंद्र म्हस्के , संतोष मटियाची तालुकाध्यक्ष, निलेश असुले, नानासाहेब डहाणे, शैलेश खारकर, अमोल मढगे, अमोल आसोले, पंकज खारकर, निलेश गायकवाड, मंगेश धामणकर, शरद खारकर, वद्रभूषण खारकर, मंगेश खारकर, केशवराव लोंढे, अक्षय पाटील, रमेश सोमवंशी इत्यादी उपस्थित होते

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment