विदर्भ

चांदुररेल्वे येथे राज्यपाल व चंद्रकांत पाटलांचा निषेध

चांदुर रेल्वे – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महापुरुषाबाबत बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी सावित्रीबाई फुले व नंतर छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषावरून विनाकारण समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे. आता तेच काम राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील करीत असून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, या महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. फुले, शाहू, आंबेडकरवादी जनतेकडून चांदुर रेल्वेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला. सातत्याने महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करून शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा करिता चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. यावेळी पंचशील स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल मकेश्वर व सदस्य सुमेध सरदार , बंडू आठवले, सतपाल वरठे, अजय राऊत, बबन वानखडे , मनोज गवई , दीपक काळे, संघपाल हरणे, समीर मकेश्वर ,आदित्य जवंजाळ, संजय आठवले,अक्षय तसरे, सौरभ गायकवाड, सक्षम वानखडे, उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment