मराठवाडा

ग्रामसेवक ४ हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला

उस्मानाबाद – गायरान जागेत घराची नोंद लावण्यासाठी १० हजाराची लाच मागितली त्या पैकी ४ हजाराची लाच स्विकारताना ग्रामसेवक रंगेहात सापडला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की.सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड,वय ४४ वर्षे ग्रामसेवक, सजा कुमाळवाडी अंतर्गत आळणी आणि तुगाव, पंचायत समिती कार्यालय उस्मानाबाद यातील तक्रारदार यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपये लाच रक्कम पंचायत समिती उस्मानाबाद कार्यालयात पंचांसमक्ष स्वीकारली. हि कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने केली आहे. सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद या सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांनी सहभाग नोंदवला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment