महाराष्ट्र साहित्य

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला खालापुरमध्ये शानदार प्रारंभ.

ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिडी काढण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यामध्ये वारकरी साहित्य परिषद आयोजित करण्यात आली असून १० व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला आज रायगड जिल्ह्यातील शानदार प्रारंभ झाला. २२ आणि २३ जानेवारी असे दोन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातुन वारकरी संप्रदायाच्या दिंडी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिडी काढण्यात आली.

या संमेलनाला महसुलमंत्री बाळासाहेब थोरत उद्घाटक म्हणुन उपस्थित आहेत. परिषदेचे उदघाटन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात याच्या हस्ते झाले.
यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांना तुळशीच्या माळा घालून सन्मान करण्यात आला.

खालापूर तालुक्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. रायगडात खालापूर येथे पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषद होत आहे. दि. २२ व २३ जानेवारी रोजी खालापुर तालुक्यातील देवन्हावे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असुन कोरोना नियमांना अधिन राहुन कार्यक्रमाचे आयोजन अगदी कमी उपस्थिती मध्ये दोन दिवसात केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आज २२ जानेवारी रोजी आमदार महेद्रं थोरवे याच्या हस्ते साहित्य दिडीं शुभांरभ झाला.

मावळचे खासदार अप्पा बारणे, हभप अशिष महाराज उपस्थित राहणार आहेत.
वारकरी सप्रंदायचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) व सचिन सदांनद मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कोरोनाच्या नियमांना अधिन राहत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मेहनत घेतली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment