पश्चिम महाराष्ट्र

आबालाल रेहमान यांना रंगबहार च्या वतीने अभिवादन

कोल्हापूर – चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांच्या स्मृतिदिनानिमित्य आज दिनांक २८ रोजी रंगबहार च्या वतीने अभिवादन करण्यात आले. शिल्पकार संजीव संकपाळ यांनी पद्माराजे उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी धनंजय जाधव, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे,सागर बगाडे,बबन माने, प्रा.मणिपद्म हर्षवर्धन,प्रा.गजेंद्र वाघमारे,प्रा.शैलेश राऊत,यांच्यासह रा शी गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना शिल्पकार संजीव संकपाळ यांनी कोल्हापुरातील कलापरंपरेचा आढावा घेतला. तसेच राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार आबालाल रेहमान यांचा हा पुतळा म्हणजे कलाकारांच्या साठी प्रेरणादायी आहे. देश विदेशात आबालाल रेहमान यांच्या कलाकृती गौरविल्या आहेत. आपण कलाशाखेतील विध्यार्थ्यानी आबालाल मास्तरांच्या कलाकृतींचा अभ्यास करावा म्हणजे त्यांच्या कामाचा दर्जा लक्षात येईल असे मत व्यक्त केले .प्राचार्य अजेय दळवी यांनी प्रास्ताविक केले तसेच विजय टिपुगडे यांनी आभार मानले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment