हिंगणघाट – दिनांक १४ डिसेंबर रोजी वडणेर येथील स्थानिक साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, संरक्षण, तसेच विद्यार्थिनी तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘महिला सुरक्षा व सायबर क्राइम’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उत्तम पारेकर, प्रमुख अतिथि उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, मार्गदर्शक उपनिरीक्षक पोलिस स्टेशन वडणेर अभिषेक बागडी, पोलिस मित्र खुशबू , संयोजक प्रा.आरती देशमुख, यांच्या उपस्थितीत झाला.
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषनाचा सामना करावा लागतो. घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मुलांकडून अशा अनेक समस्या भेडसावत असतात. तेव्हा याबाबत आपण अधिक जागृत राहून महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. पोलिस मित्र आपल्या पाठीशी सदैव राहतील व आपणास सुरक्षा प्रदान करून आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. आणि आपल्यावर कोणत्याही अन्याय किंवा शोषण होणार नाही यासाठी आपण अधिक जागृत राहावे. असे विचार मार्गदर्शक अभिषेक बागडी उपनिरीक्षक पोलिस स्टेशन वडणेर यांनी मांडले.
यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर म्हणाले की, विद्यार्थिनींचा कोणत्याही प्रकारचा छळ होत असल्यास त्याचा प्रतिकार करणे महिलांनी शिकले पाहिजे. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थीनींची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनींनी भविष्यकाळाचा विचार न करता आजचा विचार करा. व कुठलीही भीती न बाळगता अत्याचाराची माहिती त्वरित वडणेर पोलिस स्टेशनसेलच्या समन्वयक आरती देशमुख किंवा पोलिस मित्र खुशबू यांना कळवा असे विद्यार्थीनींना निक्षून सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विठ्ठल घिनमीने, डॉ. नितेश तेलहांडे, डॉ. संजय दिवेकर, प्रिती सायंकार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सारिका चौधरी यांनी , सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद मुडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आरती देशमुख यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राधिका गोटेफोडे, आचल खिरटकर, रेशम खिरटकर, नेहा येलके, रुचिता वेले, स्नेहल कोटकर, पायल सेवेकर, सोनल दोडके, पल्लवी पिंपलशेंडे, तेजस आडे, उमेश चौधरी, उज्वला गुरनुले, प्रशांत निवल, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे, अंकुश वैद्य व माझी विद्यार्थी सचिन महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.