बारामती – ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी पॅनलच्या बाजूने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जेसीबी साह्याने गुलालाची उधळण केल्याप्रकरणी पॅनल प्रमुखांसह माजी सरपंचांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवार ता.२० दुपारी एकच्या दरम्यान बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत वरील आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रँली काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळान करत विनापरवाना डि.जे चा मिरवणुकीत वापर केला. मयुरेश्वर मंदिरा समोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नितीमत्ता यास धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण केले. पोलीसांकडून देण्यात आलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.