विदर्भ

अमरावतीत बंदी असलेल्या गुटखा तस्करी जोरात

अमरावती – सक्करसाथ येथील एका गोदामावर धाड टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला ३ लाख ४१ हजार ५५० रुपयांचा गुटखासाठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली.

राजेश भगवानदासवानी (४८) रा. रामपुरी कॅम्प असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजेश केशवानी याने सक्करसाथ येथील एका गोदामामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने या गोदामावर धाड टाकली. झडतीदरम्यान गोदामात वेगवेगळ्या कंपनीचा ३ लाख ४१ हजार ५५० रुपयांचा गुटखासाठा आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राजेश केशवानी याला अटक आदींनी केली.

करून गुटखासाठा जप्त केला. या प्रकरणी आरोप राजेश केशवानी याच्याविरुद्ध खोलापुरी गेट ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंकजकुमार चक्रे, विशाल वाकपांजर, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर आदींनी केली

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment