पश्चिम महाराष्ट्र

आधी दोन श्वानांची भांडणे मग त्यांच्या मालकांत पट्ट्याने हाणामारी

पुणे – पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. अशीच एक घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली आहे. विद्यापीठ आवारात प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि ओंकार संदीप बोत्रे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) आपल्या श्वानांना फिरायला घेऊन आले होते. त्यावेळेस दोन श्वानांत भांडण सुरु झाले. यावरूनच प्रतीक आणि ओंकार यांच्यात पट्टाने हाणामारी झाली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि प्रतीक हे श्वानाला फिरायला घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बाहेर पडले होते. त्यावेळी दोघांच्या श्वानांमध्ये भांडणे झाली. त्या वेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मात्र ओंकारने मी श्वानांच्या भांडणात पडणार नाही असं सांगितलं आणि तिथून निघून गेला.

याचाच राग प्रतीकला आला आणि प्रतिकने मागून जात श्वानाच्या चामड्याच्या पट्ट्याने ओंकारवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ओंकार जखमी झाला. त्यात ओंकारच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर ओंकार बोत्रे याने प्रतीक मदने याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यासंबंधी पोलीस नाईक रायकर अधिक तपास करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment