खान्देश

लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा

धुळे – लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तयार करावा या प्रमुख मागण्यांसाठी धुळे शहरातून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान विविध पोलीस ठाण्याचे तब्बल ३५ पोलीस अधिकारी आणि २५५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

शाहरुख खानच्या प्रदर्शित होणाऱ्या पठाण चित्रपटात भगवा रंगाला बेशरम रंग म्हटले आहे. मात्र याच रंगाने देशाला हिंदुस्तान बनविले आहे, हाच रंग प्रभू श्रीरामांनी परिधान केला तर याच रंगाचा झेंडा छत्रपती शिवरायांनी रायगडावर फडकवला या रंगाची बदनामी आम्ही कदापिही सहन करणार नाही.

पठाण चित्रपटातील हे गाणं हटवण्यात न आल्यास पठाण चित्रपट चालू देणार नाही, महाराष्ट्रातील एका मंत्राच्या अंगावर शाही फेकणे हा जर गुन्हा नसेल तर चित्रपटाच्या पडद्यावर शाही फेकणे हा गुन्हा कसा असेल.? आपण आपल्या मुलींना जिजामाता बनवले नाही तर शिवाजी महाराज जन्माला कसे येतील असा प्रश्न सुरेश चव्हाणके यांनी यावेळी उपस्थित केला.

लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा हा आलाच पाहिजे, लव जिहाद करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, गुढीपाडव्यापर्यंत हा कायदा महाराष्ट्रात लागू न झाल्यास, रस्त्यावर उतरलेली ही जनता मुंबईला घेरेल असा इशारा सुरेश चव्हाणके यांनी यावेळी दिला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment