पश्चिम महाराष्ट्र

हिंदूराष्ट्र सेना व बजरंग दलाचा हैदोस;पठाण चित्रपटाला विरोध करत फाडले पोस्टर

सोलापूर – पठाण चित्रपटाला सोलापुरात जबरदस्त विरोध केला जात आहे. शुक्रवारी सोलापूर शहरातील उमा थिएटर येथे हिंदू राष्ट्र सेना,बजरंग दल,व हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी,पठाण चित्रपटाला जबरदस्त विरोध करत पोस्टर फाडले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी ताबडतोब,घटनास्थळी धाव घेऊन ,बजरंग दल व हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्याना ताब्यात घेतले. यावेळी हिंदू राष्ट्र सेना व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

चित्रपटगृहात घुसून धुडगूस
सोलापूर शहरातील उमा चित्रपट गृहात अचानकपणे बजरंग दल,हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून ,घोषणाबाजी केली. बाहेर बाजूस लावलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. विरोध करणाऱ्याना रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

काही तरुणांनी पठाण पोस्टर हातात घेऊन दुचाकी वाहनांवर हुल्लडबाजी केली
फौजदार चावडी पोलिसांनी सर्वांना घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी एका कार्यकर्त्याने माहिती देताना ,सांगितले की,काही तरुण ,दोन ते तीन दिवसांपासून दुचाकी वाहने जोरात,आवाज करत,हातात पठाण चित्रपटाचे पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत फिरत आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी पोस्टर फाडण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी गोरक्षक दलाचे सुधीर बहिरवडे,भाजपचे समर्थ बंडे,,हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे आदींना ताब्यात घेण्यात आले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment