रत्नागिरी – कोकणात प्रास्तवित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आता कातळशिल्पांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही कातळ शिल्प सुमारे वीस हजार वर्षांपूर्वीची असून युनोस्कोच्या यादीतही वर्ल्ड हेरिटेज साईटवर या शिल्पांचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय विज्ञानाने आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीनेच रिफायनरी प्रकल्पामूळे ही कातळशिल्प असलेला ऐतिहासिक ठेवा धोक्यात येऊ शकतो असा अहवाल दिला आहे.
राजापूर येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला कातळशिल्प यांचा अडथळा निर्माण होणार असल्याने शिंदे व फडणवीस सरकार यांच्यासाठी हा विषय अडचणीचा ठरू शकतो. गेल्या महिन्यात केंद्रीय विज्ञानाने आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने गेल्या महिन्यात बारसू आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आहे.
त्यामुळे रिफायनरीमुळे कातळशिल्पांना धोका होऊ शकतो असल्याचा अहवाल तज्ञ समितीने दिला आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज यांच्या माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षते खाली समिती स्थापन करण्यात आली आहे केंद्राच्या समितीने बारसू, रुंदे, देवीचे हासणे, देवाचे गोठणे, उक्षी, जावे, करोडी या भागांना भेट देऊन कातळ शिल्पांच्या संवर्धनाचे उपाय सुचवले आहे ही कातळ शिल्प २० हजार वर्षापूर्वीची जुनी असल्याचे सांगितले जाते. तर कातळ शिल्पाना आर. के. लॉजिक ऑफ सर्व्हे इंडिया यांनी संरक्षण दिले आहे. तसेच युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज ऑफ साईट यांची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन निश्चित करण्याआधी सरकारने संयुक्त सर्वेक्षण करण्याची गरज होती असे समितीचे प्रमुख वसंत शिंदे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र व राज्य शासन कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.