पश्चिम महाराष्ट्र

हिताची पेमेंट एटीएम मशीन धोक्यात, तिघांना अटक

सोलापूर – हिताची पेमेंटस सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनीच्या एटीएम मधून तब्बल १० लाख लंपास करणाऱ्या राहुल कामरुद्दीन खान (वय-२७),मोहम्मद असिम खान (वय-२४) व मोहम्मद सलिम खान (वय-२४) तिघे (रा.हरियाणा) या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली.या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी १ कार, १२ एटीएम व ३० हजारांची रोकड असा मुदेमाल जप्त केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली. देशभरात हिताची कंपनीच्या एटीएम सेंटरला टार्गेट केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममधून पैसे काढताना संशयीत इसम मेन स्विच बंद करत होते, त्यामुळे रक्कम निघत होती, मात्र बँकेच्या खात्यात रक्कम ती वजा होत नव्हती, असा तांत्रिक फायदा उचलत एटीएम मधून रक्कम चोरत होते .हिताची कंपनीला याची माहिती ,१५ दिवसांनंतर ऑडिट होताना माहिती होत होती. हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यातील अनेक तरुण हिताची कंपनीच्या एटीएम मशीनला टार्गेट करत देशभरात पसरले आहेत.

या तिघांनी सोलापुरातील हिताची कंपनीच्या एटीएमला टार्गेट केले होते
ऑक्टोबरमध्ये तिघेजण कार घेऊन हरियाणातून सोलापूरात आले होते. त्यांनी हिताची पेमेंटस सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनीच्या एसटी स्टँड परिसरातील एटीएममधून पॉवर सप्लाय बंद करून पैसे काढून घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. तेव्हा एसटी स्टँड परिसरात फिरणाऱ्या तिघांवर पोलिसांचा संशय वाढला होता. शिवाजी चौकातील अवि लॉजजवळील एटीएमध्ये ७ डेबिट कार्ड बापरून त्या तिघांनी १ लाख ९९ हजार रुपये लंपास केले होते.११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांत तेथील पैसे काढले. तर जुना विडी घरकुल परिसरातील हिरामोती टॉवर (सोनिया नगर), योगेश्वर नगर,(शिंदे शाळेजवळ) व हैद्राबाद रोड येथील हिताची कंपनीच्या एटीएममधून चोरट्यांनी ५ लाख ९९ हजार २०० रुपये लंपास केले होते.फौजदार चावडी पोलिसांनी संशयित म्हणून पकडलेले हरियाणाचे तेच तिघे आरोपी निघाले होते. पोलिसांनी त्या तिघांना एसटी स्टँड परिसरातून अटक केली.

एटीएममधील पॉवर सप्लाय करायचे बंद
हरियाणाचे तिन्ही संशयीत आरोपी हे दर दोन महिन्यांनी सोलापुरात येत होते.व एटीएम मधून पैसे काढताना ते तिघे एटीएममधील पॉवर सप्लाय बंद करायचे. पॉवर सप्लायची चावी तेथेच वर असायची हे त्यांना माहीत झाले होते. पैसे काढताना पॉवर सप्लाय बंद केल्यानंतर ज्याच्या खात्यावरील पैसे काढतात.ते पैसे काढलेल्याची नोंद होत नव्हती. ज्याच्या खात्यावरील पैसे काढले ते त्याच्या खात्यावर तसेच दिसायचे. अशी माहिती पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment