मोझरी – दिवसेंदिवस घातपात , सिलेंडर भडाका होऊन आगी लागणे या घटनेमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे आणि या घटनेमुळे अख्य कुटुंबच रस्यावर येतांना दिसते अशीच घटना अमरावती जिल्यातील तिवसा तालुकयातील मोझरी येथील रहिवासी गजानन पुंडलिकराव उमप यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य जवळून खाक झाले. याप्रसंगी कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी घर मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना मोझरी येथे २६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून. अचानक शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. घरातून धुर निघत असल्याचे घरातील सदस्यांना लक्षात येताच घरातील सदस्य व नागरिकांनी यावेळी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातून धुर आगीचे लोळ येत असल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तरी देखील शेजारच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली, परंतु तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसली तरी घरातील जीवनावश्यक वस्तू व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे, सदर घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे, हलाखीच्या परिस्थितीत मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मोझरी येथील गजानन उमप यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आला आहे, शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा त्याच्या कुटूंबियाकडून करण्यात येत आहे .