पश्चिम महाराष्ट्र

पतीपत्नीचे खाजगी व्हिडीओ चित्रित, आरोपी गजाआड

सोलापूर – सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीतील खासगी क्षणाचे व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ही घटना घडली. या संदर्भात पीडित महिलेने आपल्या कुटुंबासह पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. शेजारी राहणारा संशयीत आरोपी सुरेश राजू कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस त्याचा तपास करत असून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

शेजाऱ्याने पती-पत्नीच व्हिडीओ शूट केलं
सोलापूर शहरातील पीडित पती – पत्नी हे १५ डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरी शरीरसंबंध प्रस्थापित करत होते. त्यावेळी पीडित पतीचे घराच्या छतावरील पत्र्याकडे लक्ष गेले. तेव्हा कोणीतरी पत्र्याच्या फटीतून मोबाईलद्वारे व्हिडीओ शूटिंग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचवेळी सावध झालेल्या संशयीत आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी पीडित व्यक्तीने देखील त्या आरोपीचा पाठलाग ही केला. मात्र आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. पळून जाताना सदर संशयीत आरोपी हा आपल्या घराशेजारी राहणारा सुरेश कांबळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पीडित पती-पत्नीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली पीडित पती-पत्नी हे दोघे १५ डिसेंम्बर रोजी सकाळी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे येऊन शेजारी राहणाऱ्या सुरेश कांबळे विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मध्ये पोलिसांनी भा.द.वि.३५४,३५४ -C नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पीडित पतीपत्नीने एका स्थानिक वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, आम्ही फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे येऊन दिवसभर थांबलो आहोत, पण आमची फिर्याद घेतली जात नाही. अखेर याबाबत सायंकाळी फिर्याद घेण्यात आली.

व्हिडीओ शूट करणारा संशयीत आरोपी अजूनही मोकाट
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पतीपत्नीचे खाजगी क्षणचित्रे मोबाईल मध्ये शूट करणारा सुरेश राजू कांबळे अद्यापही फरार आहे. पोलीस नाईक दराडे याचा अधिक तपास करत आहे. हा घृणास्पद किंवा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोलापुरात चर्चेला उत्त आले आहे. पतीपत्नी बेडरूममधील खाजगी क्षणचित्रे मोबाईल मधून किती जणांना पाठविण्यात आले आहेत याचा देखील तपास होणे गरजेचे आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment