मराठवाडा

मी बदला घेणार ; सोडणार नाही – माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर का झाले आक्रमक

चंद्रपूर – मी लोकसभेत जिंकलो नाही त्याची कारणे अनेक आहेत. हा पराभव माझा वर्णी लागला आहे. मला बदला घ्यायचा आहे. मी सोडणार नाही. हे बोल आहेत माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर यांचे. शांत स्वभावाचे अहिर आक्रमक झालेत. त्यांचं हे रूप अनेकांना नव होत. त्यामुळं अहिरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात तूफान वायरल झाला आहे. या व्हिडिओत अहिर पुढे म्हणतात, काम न करणारा व्यक्ती जिकला, मला सांगतो, अरे तू जिंकून घरी बसलास मी हरलो तरी सामन्यासाठी घराबाहेर पडतो., असा टोला अहिरानी लगावला. अहिर यांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी हा टोला खासदार बाळू धानोरकर यांच्यासाठी होता. हे लपून राहील नाही.

पराभवाचे अनेक कारणे आहेत, अस अहिर म्हणालेत. अहिर शांत स्वभावाचे असले तरी त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. जीवाभावाचे कार्यकर्ते अहिर यांच्याशी जुडले आहेत. त्यांचा पराभवात स्वपक्षियांचा मोठा हातभार होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती, ती आजही सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा चंद्रपुरात आले होते. नड्डा यांचा कार्यक्रमात भाजपातील अंतर्गत वाद पुढे आला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अहिर यांच्या घरी जाणे टाळले. तर आमदार बंटी भांगडिया याना मुनगंटीवारचे घर नकोसे झाले होते. या सभेनंतर लोकसभेची सीट मुनगंटीवार यांना मिळणार अशी चर्चा सुरू झाली. जर मुनगंटीवार यांना लोकसभेची सीट मिळाली तर अहिर यांची काय भूमिका असेल यावर राजकीय वर्तुळात चिंतन, मंथन सुरू झालं आहे. सोडणार नाही, बदला घेणार, असं जाहीररित्या बोलणारे अहिर विरोधकांना आणि स्वपक्षातील आगलाव्याचा मार्ग कसे रोखून धरतात,हे बघणे रंजक ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment