विदर्भ

मी एक ही रुपयांचा भ्रष्टाचार केलेला नाही-उदय सामंत

नागपूर – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोप करण्यात आले पण हे सगळे आरोप फेटाळून लावत सामंत यांनी विरोधकांना सज्जड ईशारा दिला आहे. मी कोणतीही कसलीही जमीन घेतलेली नाही, मी एक ही रुपयांचा भ्रष्टाचार केलेला नाही.

माझ्यावर आरोप करून विरोधकांकडुन बातम्या पसरवण्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ही उद्योगमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे सरकार मधील तीन मंत्र्यांनी गायरान जमिनी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यात तीन मंत्र्यांचा समावेश असून यात अब्दुल सत्तार,संजय राठोड व उदय सामंत यांच्या वर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला आहे. मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही. मंत्री उदय सामंत याच्या जमीन घोटाळा संदर्भातील चर्चेनंतर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही. विरोधकांनी विनाकारण बदनाम करू नये. कोणतीही जमीन मी कोणालाही दिलेली नाही मी एक रुपयाचे भ्रष्टाचार केलेला नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यामुळे आता उदय सामंत आणि दिलेला स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर आता विरोधकांकडुन काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment