पश्चिम महाराष्ट्र

कॉलेजमध्ये नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया, मनसे आक्रमक   

कोल्हापूर – येथील शहाजी लॉ महाविद्यालयात नियमबाह्य पद्धतीने केलेली प्रवेश प्रक्रिया (स्पॉट अॅडमिशन) रद्द करावी आणि मनमानी कारभार करून दिलेल्या प्रवेश प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कॉलेज प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात समाधानकारक खुलासा न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्राचार्यांना देण्यात आले.
शहाजी लॉ महाविद्यालयात राज्य सामायिक प्रवेश कक्ष (सीईटी) च्या वतीने विधी शाखेची प्रक्रिया सुरु होती. तिसऱ्या फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयामध्ये उपलब्ध जागेवर विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश देण्यात आला आहे. विधी शाखेच्या प्रवेशाची मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवली असताना शहाजी लॉ महाविद्यालयात शिल्लक असलेल्या जागा मेरिट लिस्ट न लावता नियमबाह्य पद्धतीने व आपल्या मनमानीनुसार का भरून घेतल्या याचा खुलासा करण्याची मागणी मनसेने केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment