पुणे – पुण्यात सद्या गुन्हेगारीच प्रमाण वाढलं असताना ते आता वर्चस्व च्या वादापर्यंत पोहोचत आहे. पुण्यात दिवसांनदिवस गली बोळ्यात रोज एक नवीन भाई तयार होईल लागले आहेत. आणि पुण्याचं एक भयाण वास्तव चित्र दिसायला लागलं आहे. पुण्यात तीन दिवसांपूर्वी कदम वाहक वस्ती परिसरात केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद झाला अंक टोका पर्यंत पोहोचला. थेट एका तरुणाने दुसऱ्यावर धारधात सुरीने वार करून त्याला जखमी करून पसार झाला
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिवम राखुंडे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी धीरज कांबळे (वय २३) व गणेश अनिल पांढरेकर (वय २१) यांना अटक केली आहे. तिघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कदमवाक वस्तीत हा प्रकार घडला आहे. .
कदमवाक वस्तीतील एका प्रसिद्ध चहाच्या दुकानी ते एकत्र आले होते. त्यावेळी धीरज व शिवम यांची नजरेला नजर भिडली. त्यातून त्या दोघांत वाद झाले. त्यानंतर शिवमने त्यांना फोनकरून तुझा काही तरी गैरसमज झाला आहे, असे म्हणत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, धीरजने त्याला भेटण्यासाठी म्हणून बोलावले. शिवम त्याच्या मित्रांसोबत तेथे गेल्यानंतर धीरज व गणेशने त्याला मारहाणकरत सुरीने वार केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.