विदर्भ

प्रजासत्ताक दिनीच शेकडो नागरिक बसले पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण

अमरावती – जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील ग्राम कानोली येथे जीवन प्राधिकरणाच्या जुन्या टाकीतून गरीब वस्तीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावठाणातील उंच भागावर ग्रामपंचायत च्या जागेवर नवीन पाण्याची टाकी तातडीने करण्यात यावी त्याकरिता शासन प्रशासनाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजूवूनही पाण्याची टाकी करण्यास प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी शेवटी आज आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला असून उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्या कार्यालयासमोर कानोली येथील शेकडो पुरुष व महिला सामूहिकपणे आमरण उपोषणाला बसलेले असून पिण्याच्या पाण्याची टाकीची मागणी करत आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे पूर्व दिनीच शेकडो नागरिक उपोषणाला बसल्याने आता प्रशासकीय यंत्रणा काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment