कोंकण महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यात नववर्षाच्या जल्लोषाव राहणार पोलिसांची करडी नजर

 रत्नागिरी – कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा होणार आहे. कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसाठी ही जय्यत तयारी करण्यात आली आहे. जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथक ठेवले आहे. त्यावर व्हिडिओग्राफी पथाकाचीही नजर असणार आहे. हजारोनी पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सगळ्यांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेण्यात आली आहे.

मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्याांवर विशेष लक्ष ठेवले असून मद्यप्राशन करून वाहन चालववल्यास ब्रेथ एनालाईझर या यंत्राद्वारे चाचणी केली जाणार आहे. तसेच समुद्रकिनारे, महामार्गावर पोलिसांची विशेष गस्त असणार आहे. दापोली,गुहागर,रत्नागिरी गणपतीपुळे याठिकाणी विशेष नजर असणार आहे. जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्या ठिकाणी असणारी पर्यटनस्थळे, अनेक ठिकाणी जल्लोष कार्यक्रम आयोजित केले जातात. जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून असणारी ओळख लक्षात घेता अनेक ठिकाणी २०२३ या नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून, राज्यातूनच नव्हे तर संपूणय देशातून नागरिक, पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. या सपूर्ण कालावधीध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे.

शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) आणि १ जानेवारी २०२३ ला समुद्रकिनारे, महामार्गावर पोलिसांची गस्त असणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या जल्लोष कार्यक्रमाांवर नजरठेवण्यासाठी विशेष गस्ती पथकांची निर्मिती केली आहे. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्याांवर विशेष लक्ष देण्यासाठी साध्या वेषातील पोलिस पथके कार्यरत ठेवली आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालववल्यास ब्रेथ एनालाईझर या यंत्राद्वारे चाचणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर व १ जानवारी २०२३ ला जल्लोष कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणांवर व्हिडिओग्राफी पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. विदेशी पर्यटक महिलांची तसेच परराज्यातून येणाऱ्या महिलांची छेडछाड होणार नाही, यासाठी महिला पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकामार्फत विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ३४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. सोशल मिडियावरील नववर्षाच्या स्वागताचे अश्‍लील आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलिस ठाण्याद्यावेर करडी नजर ठेवण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी व मदतीसाठी ११२ या क्रमाकांवर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment