पश्चिम महाराष्ट्र

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे प्रदेश अधिवेशन कोल्हापूरमध्ये सुरु झाले. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी एव्हरेस्ट वीरांगना कु. कस्तुरी सावेकर .यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. २५ डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी उद्योजक. सुधीर मुतालिक, तसेच अभाविप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. अल्लम प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

एव्हरेस्ट वीरांगना कस्तुरी सावेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. सोबतच, निसर्गा सोबतची नाळ तुटली तर बऱ्याच गोष्टी हाता बाहेर जातील, त्यामुळे निसर्गा समोर कायम नम्रपणे राहणे, असा मोला सल्ला त्यांनी दिला.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा देत “माणूस घडवणारी संघटना आणि या संघटनेचे सदस्य असण अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे” असे मत व्यक्त केले. तसेच, आयुष्याच एव्हरेस्ट सर करून त्यावर आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा झेंडा फडकवा, असे आवाहन देखील त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.

एकात्मता आणि राष्ट्रीय सुरक्षा ला लक्षात घेता अभाविप चे कार्य सुरू आहे. तसेच, अभाविप विद्यार्थ्यांच्या जीवनाला नविन दिशा दाखवण्याचे कार्य करते, असे अभाविप राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्लम प्रभू यांनी सांगितले.

प्रसिद्ध उद्योजक सुधीर मुतालिक यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील विद्यार्थी परिषदे च्या आठवणी सांगितल्या. अधिवेशनातून मी घडलो, विद्यार्थी परिषदेने माझ्या वर अगदी आई सारखे संस्कार केले असे त्यांनी यावेळी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment