विदर्भ

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन

नागपूर – आज पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे. महाराष्ट्रातील ७५००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी विकासात भर घालण्यासाठी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकांर्पण आणि नागपूर मेट्रोची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांनी २०१७ साली पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था, नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान सकाळी ९. ३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे १० वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते ‘नागपूर मेट्रो राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रोचे भूमिपूजन करतील. सकाळी १०;४५ वाजता नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील. सकाळी ११. १५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे. नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात, सकाळी ११;३० वाजता, १५०० कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ते राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र , चंद्रपूर’चे सुद्धा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कसा असेल नागपूर दौरा सविस्तर पहा

सकाळी ९. २५ — नागपूर विमानतळ आगमन
सकाळी ९. ४० — रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
सकाळी ९. ४५ — स्टेशनवर आगमन
सकाळी ९. ४५ ते ९.५५ –वंदे भारत एक्सप्रेस Flagging off*
सकाळी १०. ००– मोदी बर्डी परिसरातील फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकावर दाखल होतील.
सकाळी १०. १० — मेट्रो प्रदर्शनाची पाहणी – आणि खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास करतील.

सकाळी १०. २०- खापरी मेट्रो स्थानाकावर आगमन, मोदींच्या हस्ते नागपूर फेज १ च्या २ मार्गांचं लोकार्पण करतील. मेट्रो फेज २ चं भूमीपूजन होईल.
सकाळी १०. ४५ — समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन
सकाळी १०. ४५ ते ११. ०० –समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास व महामार्गाचे लोकार्पण.

सकाळी११. ३५ — मिनिटांनी नागपूर मेट्रोचे फेस टू व नाग नदीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
दुपारी १२. ३५ — नागपूर विमानतळाकडे प्रस्थान
दुपारी १२. २५ — नागपुरातून विमानाने गोव्यासाठी प्रस्थान

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय?

७०१ कि.मी.चा मार्ग
नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण झाला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे लोकार्पण करणार आहेत.
उर्वरित १८१ कि.मी. पुढच्या ६ महिन्यात पूर्ण होणार आहे.
हा महामार्ग ३ अभयारण्यातून जाणार. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये, म्हणून अंडरपास करण्यात आलाय. असे एकूण२०९ अंडरपास मार्ग काढण्यात आले आहेत.
प्रकल्पासाठी लागलेला खर्च : ५५,३५५ कोटी
सहा पदरी असणार मार्ग/१५० कि.मी. वेगाने वाहन क्षमता
प्रतिदिवशी ३० ते ३५ हजार वाहने धावणार
देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना, मुख्यमंत्री असतानाच केले काम सुरू करण्यात आले.
सर्वाधिक गतीने पूर्ण झालेले भूसंपादन : ८८०० हेक्टर जागा अवघ्या १२ महिन्यात भूसंपादन करण्यात आले. यासाठी ८००३. ०३ कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment