पश्चिम महाराष्ट्र

भारतीय सैन्य दलातील जवानाची आत्महत्या

कोल्हापूर – जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील काखे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तरून जवानाने (Indian Army Jawan Suicied) आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सत्यजीत खुडे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. (Kolhapur Panhala Crime News)

पन्हाळा तालुक्यातील सत्यजित महादेव खुडे या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना काल दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सत्यजित खुडे हे गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. यावर्षी जानेवारीत ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते.

काल दुपारी सत्यजित हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांचा भाऊ सुनील हा सत्यजित यांना उठविण्यासाठी गेला असता त्यांना सत्यजित यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर सत्यजित यांना तातडीने उपचारासाठी कोडोली येथील यशवंत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सत्यजित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. कोडोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment