क्रीडा

IndiaVsEngland 4th Test : भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

IndiaVsEngland 4th Test : भारताने चौथ्या ओव्हल कसोटीत दणदणीत विजय साजरा केला आहे. भारताने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूने टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 50 वर्षांनंतर ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला.  

दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी 100 धावांची भागीदारी केली. मात्र हे सातत्य मधल्या फळीतील खेळाडूंना राखता आलं नाही. इंग्लंडकडून हासीब हमीदने 193 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. तर रॉरी बर्न्सने 125 चेंडूत 50 धावा केल्या. कर्णधार जो रुटने 36, ख्रिस वोक्सने 18, क्रिग ओव्हर्टन 10, ओली रॉबिनसनने 10 धावा केल्या. मधल्या फळीतील खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर टीकू शकले नाहीत. भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 3, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेत आता भारताने आघाडी घेतली आहेत. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. तर तिसऱ्या कसोटी भारताने 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. आता चौथी कसोटी जिंकत भारताने पुन्हा एकदा 2-1 आघाडी मिळवली आहे. 

भारताने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 466 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 368 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचा संघ अवघ्या 210 धावात ऑलआऊट झाला.

रोहितचं विदेशातील पहिलं शतक

रोहित शर्माने पहिल्यांदा विदेशातील आपले कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने 204 बॉलमध्ये एक षटकरासह आणि 12 चौकरासह आपले शतक पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने आठवे शतक पूर्ण केले.  

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment