कोंकण महाराष्ट्र

गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटकसाठी राज्यातील गावे पळवतील; – आदित्य ठाकरे

रायगड – गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले तसे कर्नाटक निवडणुकीसाठी राज्यातील गावं पळवतील, अशी सडकून टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे गुरुवारी रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना ही टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मातीतल्या खेळांना महत्व दिलं पाहिजे, मैदाने वाचवली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, मैदान कौनसा भी हो साथ में खेलना है ओर साथ मे जितना है. मातीत खेळण्याची मजा वेगळीच असते; आता आर्टिफिशियल मैदान आहे. आपण जेव्हा म्हणतो की आपली माणसं आपली माणसे हेच ते चित्र या मैदानात दिसत आहे. पुढे जात असताना देशाचा जेव्हा आपण विचार करतो. उद्योग, राजकीय असेल, देशाला एकत्र आणण्याचं काम खेळासारखा दुसरं काही नाही. महाराष्ट्राला प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योग, गावे, जिल्हे दुसऱ्या राज्यात जात आहेत. तसेच महापुरुषांचा अपमान देखील होत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या रोह्यात बल्क प्रकल्प आणणार होतो दुसऱ्या राज्यात गेला. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार बसल्यानंतर पाच प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. बल्क ड्रक प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. बेळगाव बाबत हे सरकार बोलत नाही घाबरट सरकार आहे. असे अनेक विषय आहेत, महिला अत्याचार, शेतकरी असे अनेक प्रश्न असून दुसरं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. हे राजकारण आहे. हे राजकारण दूषित करायचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी देशातील विधानसभा निवडणूक निकलांवर भाष्य केलं. सर्व विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, या विजयानंतर आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घेतील. हे सरकार घटनाबाह्य आहे; ४० लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment