विदर्भ

चांदुर रेल्वे येथील साई मंदिर मध्ये काल्याचे किर्तन

चांदुर रेल्वे – चांदुर रेल्वे शहरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले साई मंदिर मागील वर्षी भाविक भक्तासाठी सुरू करण्यात आले होते. सदर मंदिराला आज एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे मंदिरामध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आळंदी येथील ह.भ. प. सागर महाराज यांनी काल्याचे किर्तन केले. चांदुर रेल्वे पळसखेड रस्त्यावरील चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले चौधरी यांच्या शेतामध्ये सदर मंदिराची निर्मिती केली.

साई मंदिरामध्ये मागील वर्षी साईबाबा ,विठ्ठल रुक्मिणी ,गणपती या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. त्यानिमित्त वर्ष समाप्तीमुळे आज काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीपक चौधरी, ज्योती दीपक चौधरी, ह.भ.प. सागर महाराज मृदंग वादक हनुमंत तरारे, राम भोयर, मनोहर शिवणकर,प्रफुल चेनेकर, हार्मोनिक वादक विनायक वानखडे, श्रीधर देशमुख काल्याच्या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. चांदुर रेल्वे शहरातील पत्रकार बंडू आठवले,व सुरेश तिखे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काल्याचे किर्तन करणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंडलिक जेवंत चौधरी, श्रेयस चौधरी, निकिता श्रीवास, पत्रकार निशिकांत देशमुख उपस्तित होते. अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व कल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment