कोंकण

आमदार नितेश राणे यांचा कणकवली पोलिसांनी घेतला ताबा

न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग –

भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला असून नितेश राणे यांची या प्रकरणी ते चौकशी करणार आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणारे आम. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते घरी निघाले असताना पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या.

परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दहा दिवसांच्या दिलाशामुळे पोलिसांना नितेश राणे यांना अटक करता आले नाही. मात्र नितेश राणे यांनी आपल्या वकिलांची केलेल्या प्रदिर्घ सल्लामसलतीनंतर आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आज दुपारी आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात कणकवली न्यायालयात शरण गेले.

आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप

दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र जिल्हा न्यायालयाचा मान राखून, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे असे ते यावेळी म्हणाले.

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघार घेत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले होते.

कणकवली दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण आल्यानंतर सुमारे तीन तास सुनावणी झाली. कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती सलीम शेख यानी दिला निर्णय सुमारे 3 तास सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यानंतर कणकवली पोलिसांनी आमदार नितेश राणे यांचा ताबा घेतला आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा न्यायालयात नेले पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत पोलिसांच्या वतीने यावेळी न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत, आमदार नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, उमेश सावंत यांनी कणकवली न्यायालयात युक्तिवाद केला

यावेळी कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment